Sunday, 21 September 2014

HOW_TO_DECIDE_SUM ASSURED ?

post about HOW_TO_DECIDE_SUM ASSURED ? in Marathi language 


नमस्कार मित्रांनो !
बरेच जण एक प्रश्न नेहमी विचारतात कि policy का करायची ?
मुळात प्रश्न हा आहे कि आपल्या जीवनाची किंमत करता येत नाही त्यामुळे लाईफ इन्शुरन्स किती रुपयाचा
/ हजारंचा / किंवा लाखाचा करावा हे काही ठरवता येत नाही .
1)आपल्या जीवनाची किंमत कशी काढायची ?
2)आपल्या जीवनाची किंमत काढता येते ?
आज आपण - लाखाची कार विकत घेतो तेव्हा जो विमा ( insurance)  करतो तो कार च्या किंमतीच्या १०० % ईतका असतो .
 एवढाच काय तर आपण एखादी टू-विलर जरी खरेदी केली तरी सुद्धा तिचा संपूर्ण विमा करावा लागतो .
 मग एक प्रश्न आपल्या मनाला पडला पाहिजे कि जर आपण आपल्या गरजेच्या गोष्टींचा एवढा मोठ्या किंमतीचा
विमा करतो तर मग आपले जीवन किती अमूल्य आहे !!
त्याचा विमा आहे आपल्याकडे ?

आता बर्याच लोकांना असा प्रश्न पडतो कि माझी कार लाखाची आहे म्हणून मी तिचा लाखाचा विमा केला पण
 माझ्या जीवाची किंमत कशी काढायची ?



हा प्रश्न पडणं जेवढ साहजिक आहे तेवढाच सहज याचा उत्तर पण आहे .
आपल्या जीवनाची किंमत काढण तसं पाहायला गेलो तर चुकीचा आहे पण विमा करताना याचा विचार उपयोगी ठरणार आहे .

एखाद्या अपघातात जर आपले शरीर पूर्णपणे निकामी झाले किंवा अशी काही वेळ आली कि आता आपण
स्वतः कष्ट करून काहीच कमवू शकत नाहीओत तर त्या वेळी आपल्या दैनंदिन गरज भागवण्यासाठी आपल्याला किती पैसे लागतील ?
या सर्व पैशांची बेरीज म्हणजेच आपल्या विम्या ची रक्कम आहे !


No comments:

Post a Comment